Monday 1 February 2016

नानानू अवनल्ला ....अवालू .. i am not he .. i am she ..
आज औरंगाबाद फिल्म फेस्टिवल मध्ये " नानू अवनल्ला ....अवालू .. i am not he .. i am not she .. समाजाच्या बधीर झालेल्या संवेदनाचे चित्रण मांडणारा सिनेमा पाहिला .. साला मनातल्या मनात माणूस म्हणूनच स्वताची चीड येऊ लागली ..
हिजडा - छक्का - तृतीयपंथी - बायल्या ..
हे शब्द कानावर पडले तरी आपण तुच्छतेने पाह्ण्यार्या ह्या समाजव्यवस्थेत आज वावरतो आहे ..हिजडा ह्या माणसाच्या प्रजातीच अस्तित्व काय ? असा प्रश्न जर लोकांना विचारला तर उत्तर येईल "शून्य " ..हिजड्यांना जगण्याचा अधिका हिसकावून घेतलेल्या ह्या समाजात आपण वावरतो आहोत हेच खूप भयावह आहे .. हिजड्यांच ना नावं मतदार यादीत ना राशन कार्ड ना भारतीय असल्याचा दाखला .. देशात कायद्याचे रक्षण मिळाल्यामुळे आता ह्यात थोडाफार बदल झाला असेल पन मानसिकता तीच तुच्छतेने बघण्याची ..
नानू अवनल्ला ....अवालू हि कथा आहे एका निम्न मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेल्या मधेशी नावाच्या मुलाची ..खेड्यागावातील एका छोट कुटुंब . एक मुलगा- एक मुलगी आणि मायबाप ..बापाला वाटायचं आपला मुलगा मधेशी आपला व्यवसाय आणि राजकीय वारसा पुढे नेईल म्हणून शाळेत असताना मधेशीला अभ्यास करायला जबरदस्ती करणे ,मारहाण करणे सारखे प्रकार होऊ लागले . त्यातून एकलकोंड्या होत जातो . शाळेत फक्त एकच मित्र . आणि या सर्वात शाळेत जसे जसे वय वाढत जात तसे मधेशीला त्यात बदल जाणवायला लागतात .. त्याच्या एकुलत्या एक मित्राकडे म्हणजेच पुरुषाकडे आकर्षण जाणवू लागते . ह्या बदलांच्या गर्तेत तो इतका हरपून जातो कि शाळांत परीक्षेत नापास होतो . ह्या दरम्यान त्याच्या बहिणीचे लग्नही त्याच्या नापास होण्याचे कारण असते पण हे न समजून घेता बापाने केलेली मारहाण त्याच्या मनावर आघात करते . आणि तो गाव सोडण्याचा निर्णय घेतो ..
गाव सोडून तो त्याच्या बहिणीकडे येतो . इथे गावापेक्षा त्याला मोकळे वातावरण त्याला चांगले वाटायला लागते . त्याचे चाल चलन हि स्त्रियांसारखी असल्याने जे गावात संशयाने आणि तुच्छतेने बघण्याची मानसिकता जाणवत असायची त्याला/तिला कमी प्रमाणात जाणवायला लागली .. कोम्पुतर शिक्षण आणि सांयकाळी शाळा तो शिकत असताना त्याची बस stop वर भेट होते एका तृतीयपंथीयाशी . आणि इथून सुरु होतो त्याच्या प्रवास ती होण्याकडे ..
मला एक स्त्री म्हणून मरायचं आहे . त्यासाठी मला ऑपरेशन करतानाही मरण आले तरी चालेल .. अशा ठाम निश्चयाने ती स्वताच अस्तित्व शोधायला निघते .. आणि पोहोचत पोहोचत बुधवार पेठेत एका अम्मामार्फत पोहोचते . तेथील तिच्यासारख्याच पुरुशानासारख्या दिसण्यार्या पण मन महिलेसारख्या असण्यार्या बर्याच तिला तिथे भेटतात ..अत्यंत हलाकीची आणि शोषित आयुष्य जगन्याऱ्या ह्या वस्तीत ती प्रवेश करती . तेथील अक्का विधिवत तिला त्यांच्यात समाविष्ट करते .. आणि पुढे भिक मागण्याच काम तिला करायला लावते अर्थात ती हे काम आनंदाने करत असते पण तिला तिचा स्त्री असणे अजून सिद्ध झाल्याच जाणवत नाही म्हणून स्वतःच Sex reassignment surgery male to female करवून घेते.आणि मधेशी होतो विद्या _ शिकलेली असल्यामुळे तिच्याच समुदायातील एक हे नावं ठेवते तिचा ) तरीही पुढे तेच भिक मागण्याच काम कराव लागत ..एकदा रेल्वेत एक माणूस तिला बेदम मारहाण करतो हि गोष्ट तिच्या मनावर आघात करणारी ठरते आणि ह्या घटनेनंतर तिच्या घरी वापस जाण्याचा प्रयत्न करते ( तिच्या घरातील तिला स्वीकारतील ह्या आशेने पण संकृतीच्या नावाखाली पिचलेल्या मायबापाने तिला स्वीकारण्यास ठाम नकार दिला जातो ..
आता पुढे काय करायचे हा प्रश्न आवासून उभा राहतो?
एकीकडे मायबापा ने स्वीकारायला दिलेला नकार आणि दुसरीकडे बुधवार पेठेतील शोषित जीवन .. त्यातूने पुढे ती स्वताच्या शिक्षणाच्या बळावर नोकरी शोधायला जाते . पण मुलाखत घेताना तिला तिच्या शिक्षणाच्या संदर्भात बौद्धिक प्रश्न न विचारता तिच्या वैयक्तिक आयुष्यावर नोन सेन्स प्रश्न विचारले जातात . शेवटी नौकरी न मिळाल्याने हताश होऊन खाली हाताने माघारी परतते . कोर्टात न्याय मिळेल ह्या आशेने ती मधेशीचा विद्या हे अफिदेवीत करण्यासाठी वकिलाकडे जाते जसा सामान्यांना कोर्टाच्या भानगडीत अनुभव येतो तसाच तिला त्या वकीलाकडून येतो अक्षरशा तिला तिथून झिडकारले जाते ..
शेवटी हताश झालेल्या अवस्थेत तिला एका पोलीस स्टेशन मध्ये एक पोलीस निरीक्षक त्याच्या डायरेक्टर मित्राकडे नौकरी देऊ करतो . आणि हा प्रसंग तिच्या आयुष्यात कलाटणी देणारा आणि माईलस्टोन ठरतो . सिनेमाच्या शेवटी विद्या आज घडीला काय आहे ? त्याचे काही व्हीजुयाल्स उत्तमरित्या दाखवण्यात आले आहे ..
आज विद्याने उत्तम निर्देशक , नाट्यकलावंत , चित्रकार म्हणून देशात नव्हे जगात आपलिया वेगळी ओळख निर्माण केली आहे ..
सिनेमात तृतीयपंथीयांचे जीवन , संस्कृती आणि त्यांच राहणीमान उत्कृष्टरित्या अधोरेखित केले आहे ..
एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या शतकात आजही इतकी भयानक अवस्थेत माणस जगत आहे . विद्याचा संघर्ष , तिची समाजाशी झगडण्याची वृत्ती समाजाला प्रेरणादायी ठरते ..
एकीकडे आपण समान नागरी कायद्याच्या गप्पा झोड असतो आणि दुसरीकडे मात्र कलम ३७७ ला धार्मिक रंग देत संस्कृतीशी जोड देऊन विरोध करत असतो. भारतीय मनाची हीच दांभिकता कित्येक निष्पाप माणसाला जगणेच मुश्कील करून टाकते .. ग्लोबलायजेशनचा अभिमान मिरवताना माणसाला माणूस म्हणून जगण्याची साधी गोष्ट आज विसरून गेलो आहे ..
म्हणून आज समाजात विद्यासारख्यांना इतका कठीण संघर्ष करावा लागतो तर बुद्धीने हुशार असलेल्या रोहित वेमुलासारख्यांना जगण्यापेक्षा मृत्यू जवळ करावा वाटतो ..
हीच हजारो वर्षाच्या भारताची शोकांतिका frown emoticon
@प्रतिक पाटील
(टीप :- हे सिनेमा समीक्षण वगेरे नाहीये मनाला वाटले ते लिहिलंय )